bhagwan_baba_img2

संत भगवान बाबा

 भगवान बाबा यांचा जन्म महाराष्ट्रात बीड जिल्हात सावरगाव येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचा जन्म १८८६ चा, त्यांचं निर्वाण १९६५ साली झालं. त्यांचे खरे नाव आबाजी होते. ते लहानपणी अतिशय तल्लख होते आणि त्यांच्या वर्गात अव्वल होते.  त्यांना पाचव्या किंवा सहाव्या वर्गानंतर शिक्षक सोडावे लागल॓ कारण ते लहान गावात असल्यामुळे त॓थे पुढील शिक्षण उपलब्ध नव्हते.
-ज्ञानेश्वरींचे भाष्यकार बंकरस्वामी यांचे ते शिष्य होते. ते वारकरी संप्रदायाचे होते, प्रवचने व कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी भक्तिमार्गप्रसाराचं कार्य अद्यावत केलं.
-श्री संत भगवान बाबा वंजारी समुदायाचे प्रमुख संत आहे.
-भगवान बाबांचा जीवनात बराच काळ नरयार गडावर होते. शेवटीचा काळात ते ढोण्या गडावर होते. त्यांच्या मृत्यूनंतर ढोण्या गडाला भगवान गड म्हणतात.

ह. भ. प. वै भीमसिंह बाबा

भगवानगडाचे दुसरे वारसदार. सन १९६५ ते २००३ असे एकुन चाळीस वष॔ बांबानी गादी सांभाळली. संत भीमसिंह बाबा हे वै. बंकटस्वामीजींचे पुतणे होते आणि प्राचार्य सोनोपंत दांडेकर यांचे शिष्य होते."

namdeomaharaj

ह. भ. प. नामदेव शास्ञी महाराज

ह. भ. प. नामदेव शास्ञी महाराज भगवानगडाचे तिसरे वारसदार. शास्ञीचा जन्म ९.६.१९६० ला पंढरपुरी झाला. त्यांच्या वडीलांचे नाव भगवान आबा सानप असे होते. त्यांच्या आईचे नाव लक्शमी होते. शास्ञीजी लहान असतांना त्यांच्या आई मरण पावल्या. त्यांचा सांभाळ विठाबाई फुंदे यांनी केला. त्यांचे वास्तव्य पंढरपुरी भगवान बाबांच्या मठात होते. शास्ञीजीचे अध्यात्मिक व औपचारीक शिक्शन झाले असुन ते व्यासंगी कित॔नकार आहेत. त्यांच्या कित॔नाचे विषय वेगवेगळे असुन ते अत्यंत प्रभावशाली असतात. भाषा, शब्दातील शक्ती,कल्पकता, विषयातील सत्यता, विषयातील जाण इ. त्यांच्या कित॔नाचे वैशीष्ये आहेत.

नामदेव शास्ञी यांना २००४ मध्ये भगवानगडाचे तिसरे उत्तराधिकारी म्हणून गादीवर बसवण्यात आले. गेल्या दहा वषा॔त त्यांनी भगवानगडाचा कायापालट केला. गडावर जाण्यासाठी पक्के रस्ते केले. पाण्याची सोय केली. भोजनालय बाधुन तिथे रोजच्या रोज हजारों भक्तांच्या पक्ती उठत आहेत. बांबाच्या माडीचे स्वरुप बदलुन टाकले आहे. त्यावर आणखी मजले चढवले आहेत. बाजुच्या परीसरात देखील भरपुर प्रमाणात बांधकाम केले आहे. विद्यापीठ सुरु करुन त्यातुन अनेक तरुन संतसाहित्याचा अभ्यास करत आहेत. त्यांना शिकविण्यासाठी विद्वान पंडीतांची व्यवस्था केली. त्या विद्यापीठतुन अनेक नवीन तरुन कित॔नकार बनत आहेत. ह. भ. प. नामदेव शास्ञी सारखे दांडगे व्यक्तीमत् भगवानगडाला लाभले आहे. हे आपले भाग्य म्हणावे लागेल.